Wednesday, May 25, 2022

उद्यापासून पाच दिवस अहमदनगर शहर व जिल्ह्यात 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज- रमजान ईद व अक्षयतृतीया या सणांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे

कलम ३७ ( १ ) अन्वये जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार १ ते ५ मे २०२२ या कालावधीत अहमदनगर शहर व जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

अहमदनगर शहर व जिल्ह्यात ३ मे २०२२ रोजी रमजान ईद व अक्षयतृतीया हे सण / उत्सव साजरे केले जाणार आहेत. सदर उत्सवाच्या दरम्यान गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच जिल्हयामध्ये विविध राजकीय पक्ष कामगार संघटना तर्फे त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी मोर्चे, धरणे आंदोलने, रास्ता रोको होतात. त्याचप्रमाणे सध्या जिल्हयात यात्रा उत्सव तसेच धार्मिक

कार्यक्रम साजरे होतात त्यावेळी मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.वरील पार्श्वभूमीवर जिल्हयात कोणत्याही किरकोळ घटना वरुन कायदा व सुव्यवस्थेचा

प्रश्न निर्माण होऊ नये किंबहुना तशी परिस्थिती निर्माण झाल्यास ती हाताळण्यासाठी पोलीसांना मदत व्हावी म्हणून संपूर्ण अहमदनगर शहर व जिल्ह्यात १ मे ते ५ मे २०२२ या कालावधीत महाराष्ट्र

पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी जारी करण्यात आले आहेत.प्रतिबंधात्मक आदेश असताना शस्त्रे, काठया, सोटे तलवारी भाले, सुरे, बंदुका, दंडे अगर

लाठया किंवा शारिरीक इजा करणेसाठीवापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे., दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे व साधने जवळ बाळगणे किंवा

तयार करणे किंवा जमा करणे., कोणत्याही व्यक्तींच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे., कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक जवळ बाळगणे किंवा तयार करणे, जाहीरपणे घोषणा देणे,

गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे ध्वनिवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाच्या तसा ऐकवणारा उपकरण संच वापरणे किंवा वाजवणे, सभ्यता अगर नितीमत्ता

यास धक्का पोहचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे, आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणणे अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे

किंवा त्यांचा प्रचार करणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.सदर प्रतिबंधात्मक आदेश आदेश खालील व्यक्तींना लागू होणार नाहीत. त्यामध्ये शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपले

वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पुर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे, तसेच ज्या व्यक्तींना शारिरीक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे.

असेही जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी प्रतिबंधात्मक आदेशात नमूद केलं आहे.

ताज्या बातम्या

मुळा-निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी-मंत्री शंकरराव गडाख

नेवासा/सुखदेव फुलारी नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी...

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...
error: Content is protected !!