माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या काही दिवसांपासून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या खानपानाच्या सवयी चर्चेत आहेत. फडणवीसांची
पुरणपोळी खाण्याची सवय अनेकांच्या चर्चेचा विषय होता. झी मराठीवरच्या किचन कल्लाकार या कार्यक्रमात अमृता फडणवीस हे 35 पुरणपोळ्यापातेलंभर तुपात बुडवून खात असल्याचं सांगितलं.
त्यानंतर या विषयाची जोरदार चर्चा झाली. पण खरंच देवेंद्र फडणवीस 35 पुरणपोळ्या खातात का? त्यांना एवढी पुरणपोळी आवडते का? याचं उत्तर अमृता फडणवीस यांनीच उत्तर दिलंय.
देवेंद्र फडणवीस हे 35 पुरण पोळ्या खातात असं अमृता फडणवीसांनीच सांगितलं होतं. त्यावर त्यांनीच आज स्पष्टीकरण दिलं आहे. “देवेंद्रजींचा एक जुना मित्र आहे त्याने मला सांगितलं होतं.
की लग्नाच्या पंगतीत पैंज लागली होती. त्यात 35 पुरणपोळ्या खायच्या होत्या. त्यांनी त्या खाल्ल्या आणि जिंकले. ही गोष्ट लग्नाआधीची आहे पण लग्नानंतर मी पाहिलंय की ते
अर्धी पुरणपोळी पण खात नाहीत”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. त्या एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात बोलत होत्या.आमच्यात कधीही भांडण होत नाही पण जेव्हापासून मी
पुरणपोळीचा किस्सा सांगितला तेव्हापासून लोक यांना जाईल तिथं पुरणपोळी खायला देतात. अन् मग घरी येईन तो सगळा राग ते माझ्यावर काढतात. मग आमची भांडणं होतात”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
झी मराठीवरच्या किचन कल्लाकार या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी फडणवीस 35 पुरणपोळ्या पातेलंभर तुपासोबत खात असल्याचं सांगितलं होतं. त्यावरून बरीच चर्चा झाली.
त्यांना ट्रोलही केलं गेलं. त्यावर आज अमृता यांनी स्पष्टीकरण दिलं.