माय महाराष्ट्र न्यूज:भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या श्वेता सिंह गौर यांच्या हत्येप्रकरणी खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. श्वेता सिंह गौर यांची हत्या तिचा पती दीपक
सिंह गौर आणि त्यांच्या मोठ्या भावाने केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. तसेच दीपक सिंह गौर हा आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट चालवत असून पोलखोल होऊ नये म्हणूनच त्याने
श्वेताचा काटा काढल्याचे कुटुंबियांनी म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील जिल्हा पंचायत सदस्य आणि भाजप महिला
मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस श्वेता सिंह गौर यांचा मृतदेह संशयास्पद लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. इंद्रनगर येथील राहत्या घरी साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने
खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे ही घटना घडली तेव्हा त्यांचा पती दीपक सिंह गौर हा घरी नव्हता आणि त्यांचा फोनही बंद येत होता. त्यामुळे संशयाची सुई त्यांच्याकडे वळली आहे.
ही घटना घडली त्याच्या काही दिवस आधी श्वेता सिंह गौर यांच्या वागणुकीमध्ये बदल पाहायला मिळाला होता आणि त्या घाबरलेल्या दिसत होत्या, अशी माहिती जवळच्या लोकांनी दिली आहे.
तसेच पतीचे काळे कारनामे उघड करता यावे यासाठी पुरावेही गोळा करत होती, आणि पतीचे फोन कॉलही रेकॉर्ड करत होती. रशिया, मोरक्को आणि आफ्रिकन मुलींसाठी दलालांसोबत केलेल्या
व्यवहारांचे पुरावे तिच्या हाती लागले होते. याचा थेट संबंध आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटशी असल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे.मृत्यूपूर्वी श्वेता सिंह गौर हिने ऑडिओ रेकॉर्डिंग करून कुटुंबियांसोबत शेअर केले होते.
दीपक सिंह गौर याचे रशियन सेक्स वर्कर्ससोबत विवाहबाह्य संबंध होते आणि हे लपवण्यासाठीत त्याने आपल्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप श्वेता सिंह गौर हिचा भाऊ ऋतुराज याने केला आहे.
दरम्यान, दीपक सिंह गौर याच्या विविध ऑडिओ क्लिप समोर आल्या असून यात तो रशियन मुलींचे सौदे करत असल्याचे उघड झाले आहे. तसेच श्वेता सिंह गौर हिच्या कुटुंबियांनी
त्याच्यावर हत्येचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी दीपक सिंह गौर याला बेड्या ठोकल्या आहेत, मात्र उतर आरोपी फरार आहेत. याबाबत पोलीस अधिक्षकांनी माहिती देताना सांगितले की, पोलिसांनी
या संबंधी अनेक व्हिडीओ मिळाले असून अधिक पुरावे गोळी करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.