माय महाराष्ट्र न्यूज:सर्वाधिक तापमान असलेल्या विदर्भात रविवारी पावसाने मेघगर्जना आणि वादळी वा-यासह जोरदार हजेरी लावली यामुळे उन्हाच्या उकाळ्यापासून थोडा का होईना
विदर्भवासीयांना दिलासा मिळाला. मात्र या पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांचे काहीचे नुकसानही झाले. विदर्भातील वर्धा,अमरावती जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक
पाऊन कोसळला आहे. दरम्यान राज्यात हवामान विभाकडून अलर्ट देण्यात आला आहे.राज्यात पुढचे दोन दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस राहिले असा अंदाज हवामान विभागाने नोंदवला आहे.
याशिवाय रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पश्चिम महाराष्ट्रात पुढचे दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच परभणी, बीड, हिंगोली, नांदेड लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये वादळी
वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे तापमान कमी होण्यास मदत होईल मात्र शेतकऱ्यांना याचा फटका बसू शकतो.