Friday, May 20, 2022

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सोने स्वस्त; जाणून घ्या प्रति तोळा दर

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अक्षयतृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी केली जाते. यामुळे सराफा बाजारात मोठी उलाढाल होते.

दरम्यान, आज सोन्याच्या दरात १,२८० रुपयांची घसरण झाली. २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर ५१,५१० रुपये होता. तर चांदी ८०० रुपयांनी स्वस्त होऊन ६२,७०० रुपयांवर आली आहे.

गुडरिटर्न्स वेबसाइटच्या माहितीनुसार, २२ कॅरेट सोने १,१९० रुपयांनी स्वस्त होऊन ४७,२०० रुपयांवर आले. दिल्ली आणि मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर बंगळूर, हैदराबाद आणि कोलकाता येथे

असलेल्या दराएवढाच आहे. या ठिकाणी १० ग्रॅम सोन्याचा दर ५१,५१० रुपये एवढा आहे.फेडरल रिझर्व्हद्वारे जलद व्याज दर वाढीच्या शक्यतांमुळे सोमवारी सोन्याच्या किमतीत २ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण

झाली आहे. यामुळे सोने तीन महिन्यांच्या निचांकी पातळीवर आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस १,८६५ डॉलरवर आले आहे. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम)

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क

संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते.

जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!