माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनामुळे उद्भवलेल्या परस्थितीनंतर आता कुठे कुक्कुटपालन व्यवसाय स्थिर स्थावर होऊ लागला होता. यंदा काही नाही म्हणून वाढत्या उन्हाचा परिणाम पोल्ट्रीफार्मवर
होऊ लागला आहे. उन्हाचा पारा असा काय वाढला आहे की, दिवसाकाठी एकट्या नगर जिल्ह्यात 40 ते 50 कोंबड्याचा मृत्यू होत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात ही
समस्या उद्भवतेच पण यंदा याचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. एकीकडे उन्हामुळे फळबागांवर परिणाम झाला आहे. अखेरच्या टप्प्यात असलेले सोयाबीन कोमेजून गेले असून आता
जोड व्यवसायावरही प्रतिकूल परिणाम होऊ लागल्याने व्यवसायिक अडचणीत आले आहेत.उन्हापासून कोंबड्यांचे संरक्षण व्हावे म्हणून नगर जिल्ह्यातील व्यावसायिकांनी पोल्ट्री फार्मच्या
छतावर गवत टाकले आहे. एवढेच नाही तर नारळाच्या फांद्याही अंथरल्या आहेत. तर आता पोल्ट्री फार्ममध्ये जागोजागी फोगर बसविले आहेत. जेणेकरुन
वाढत्या उन्हापासून प्राण्यांचे संरक्षण होईल पण नुकसान हे सुरुच आहे. उलट यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गतवर्षी दिवसाकाठी 15 ते 20 कोंबड्यांचा मृत्यू होत होता पण यंदा वातावरणात
मोठा बदल झाला आहे. कोंबड्याचे दर वाढले असली तरी हे होणारे नुकसान कसे भरुन काढावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.सध्या नगर जिल्ह्यात 5 हजाराहून अधिक पोल्ट्री फार्म असून
30 लाख अंडी देणारी पक्षी तर 11 लाख 32 हजार माऊन्स देणारी पक्षी आहेय. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाच ते सहा टक्के कोंबड्यांचा मृत्यू होतो मात्र यंदा बारा टक्क्यांपर्यंत गेला आहे. वेगवेगळे
पर्याय अवलंबूनही तोडगा निघत नाही. त्यामुळे शेतकरी उष्णता कमी होण्याची वाट बघत आहेत.अति उष्णतेने पक्षाचे वजन घटत आहे, दिवसा प्रचंड ऊन पडत असल्याने या वातावरणाचाही
परिणाम या पक्षावंर होत आहे. सकाळी 8 पासून ते दुपारी 4 पर्यंत फार उन्हाचा मारा आणि त्यानंतरची धग यामुळे वाढणारी उष्णता प्रचंड असल्याने कोंबडीच्या लहान पिल्लांना पोल्ट्रीतील
कोंबडी पिल्ले फार नाजूक असतात त्यांना उष्णतेची झळ सहन होत नाही.