माय महाराष्ट्र न्यूज: देशात कोरोनाची महामारी कमी होत सर्व अडथळ्यांवर मात करत उद्योग क्षेत्र सावरले आहे. त्यामुळे यावर्षी कर्मचाऱ्यांना किमान ८.१३ टक्के ते १० टक्क्यांपेक्षा
अधिक पगारवाढ मिळण्याची शक्यता एका अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.टीमलिजच्या आर्थिक वर्ष २०२१-२२ नुसार ‘द जॉब्स अँड सॅलरी प्राइमर रिपोर्ट’ नुसार गेल्या दोन वर्षांच्या
तुलनेत यावर्षी जवळपास सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वार्षिक पगारात वाढ होऊ शकते. तथापि, वाढ मर्यादित असेल. टीमलीज सर्व्हिसेसचा हा वार्षिक अहवाल आहे .
जो १७ राज्यात आणि ९ प्रमुख शहरांमधील २ लाख ६३ हजारहून अधिक कर्मचाऱ्यांचा पगार लक्षात घेऊन करण्यात आला आहे.१७ क्षेत्रांचा आढावा घेण्यात आला आहे, त्यापैकी १४ क्षेत्रांमध्ये १० टक्क्यांपेक्षा
कमी पगारवाढ अपेक्षित आहे, तर सरासरी वाढ ८.१३% असण्याचा अंदाज आहे.सध्या वेतनवाढ १० टक्क्यांपेक्षा कमी आहे; पण चांगली गोष्ट म्हणजे आता पगार कपातीची वर्षे संपली
आहेत. पूर्वपदावर आलेले उद्योग क्षेत्र, विविध क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे वेतनवाढ कोरोना पूर्वपातळीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर आहे.