Friday, May 20, 2022

यंदा महाराष्ट्रात मान्सून इतके दिवस आधी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या की सर्वांनाच वेध लागतात ते मान्सून कधी दाखल होणार. सर्वात पहिल्यांदा बळीराजाला मान्सून वेध लागलेले असतात कारण जून

महिना हा पेरणीचा हंगाम असतो यामुळे शेतकरी आपल्या शेताची मशागत करून मान्सूनची वाट पाहत बसलेला असतो दरम्यान आता ही प्रतिक्षा संपणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार मान्सून

केरळमध्ये 27 मे ला दाखल होणार आहे. मागच्या 3 वर्षाच्या तुलनेत यंदा मान्सून आठवडाभर आधीच दाखल होणार आहे.मागच्या 3 वर्षांच्या तुलनेत मान्सून यंदा आठवडाभर लवकर येणार

असल्याने पाऊस जास्त होण्याची शक्यता आहे. 2019 साली 6 जूनला मान्सून दाखल झाला होता, 2020 साली 5 जूनला तर 2021 साली 31 मे ला मान्सून दाखल झाला होता. यंदा मात्र मान्सून 4 दिवस आधीच

दाखल होणार असल्याने पावसाचे सर्व रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.केरळमध्ये 27 मेपर्यंत पाऊस दाखल होईल तर तळकोकणात ते 2 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान

खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुखे कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदमानानवर आगामी

पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होणार आहे. त्यानंतर अरबी समुद्रावर दुसऱ्या आठवड्यात पाऊस सुरू होईल आणि त्यानंतर भारतात पुढील आठवड्यात मान्सून दाखल होईल.

मागच्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात सकाळच्या वेळेत तीव्र उष्णता जाणवत होती. ढगाळ वातावरण असल्याने उष्णतेच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. दरम्यान मागच्या

दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असुनही कोणत्याही जिल्ह्यात अद्याप पाऊस झाला नाही.गेल्या दोन दिवसांत पुण्याच्या कमाल तापमानामध्ये बदल झाला आहे. या महिन्यात

पहिल्यांदाच ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात पुण्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर दिसून आला नाही. दुसरीकडे, महाराष्ट्रातील

काही भागांत पुढील तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!