Friday, July 1, 2022

आता चेक बाऊन्स झाल्यास खैर नाही, सुप्रीम कोर्टाने दिला मोठा आदेश

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: चेक बाऊन्स झाल्यास कोर्टाकडून आधीपासूनच सक्त नियम लागू आहेत. आता जर तुमचा किंवा तुमच्या कुठल्याही

नातेवाईकाचा, मित्राचा चेक बाऊन्स झाला तर आता खैर नाही. आता सुप्रीम कोर्टाने चेक बाऊन्स प्रकरणांच्या त्वरित निवाड्यासाठी येत्या १ सप्टेंबरपासून पाच राज्यांमध्ये निवृत्त न्यायाधीशांसोबत

विशेष न्यायालयांची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत.न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, न्यायमूर्ती बी.आर गवई आणि न्यायमूर्ती एस. रवींद्र भट यांनी सांगितले की, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात,

उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असलेल्या खटल्यांमुळे नेगोशिएबल इंस्ट्रमेंट्स अॅक्ट अंतर्गत विशेष न्यायालयांची स्थापना केली जाईल. खंडपीठाने सांगितले

की, आम्ही पायलट न्यायालयांच्या स्थापनेसंदर्भात न्याय मित्रांच्या सल्ल्यांचा समावेश केला आहे. त्यासाठी आम्ही वेळमर्यादासुद्धा दिली आहे. ती १ सप्टेंबर २०२२ नंतर सुरू होईल.

पीठाने सांगितले की, या आदेशाची प्रत थेट या पाच उच्च न्यायालयांच्या महारजिस्ट्रारना मिळेल याची निश्चिती कोर्टाचे महासचिव करतील. त्यामुळे त्यावर तत्काळ कारवाईसाठी मुख्य न्यायाधीशांसमोर सादर करता येईल.

सुप्रीम कोर्टाने आपल्या महासचिवांना या आदेशाबाबत या राज्यांच्या उच्च न्यायालयांच्या महारजिस्ट्रारनां सूचना देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या आदेशांचे पालन करण्याबाबत २१ जुलै

२०२२ पर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे. एका न्याय मित्राने पायलट योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये रिटायर्ड जज यांचे एक न्यायालय असावे असा सल्ला दिला होता.

आता या प्रकरणाची सुनावणी २८ जुलै रोजी होणार आहे. सुप्रिम कोर्टाने काही दिवसांपूर्वी चेक बाऊन्सचे बरेच खटले मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहिल्याची दखल घेऊन अशा प्रकरणांचा

तत्काळ प्रभावाने निपटारा करण्याचे आदेश दिले होते. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत अशा प्रकरणांची संख्या तब्बल ३५.१६ लाख एवढी होती.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!