Friday, July 1, 2022

मुकिंदपूर ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा व नविन कामाचा भुमिपूजन संपन्न

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा प्रतिनिधी :राहुल कोळसे:राज्याच्या मंञीमंडळात नामदार शंकरराव गडाख पाटील यांची वर्णी लागल्यामुळे तालुक्यात विकास कामांचा डोंगर उभा करण्याची संधी मिळालेली आहे .

राजकारण हे आम्ही विकास कामे करण्यासाठीच करत असून काय मागायचे ते मागा सगळे कामे मार्गी लावू असे प्रतिपादन नेवासा पंचायत समितीच्या मार्गदर्शिका सौ.सुनिता गडाख यांनी

मुकिंदपूर ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा व नविन कामाचा भुमिपूजन समारंभात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.शनिवार (दि.२१) रोजी सायंकाळी

५ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपिठावर नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे,उपसभापती किशोर जोजार,माजी सरपंच लक्ष्मणराव कराडे,

सरपंच सतिष निपुंगे,उपसरपंच गणेश माटे, सौ भारतीताई करडक, अॅड राजू इनामदार,अशोकराव करकड,ग्रामसेवक संतोष खंडागळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 यावेळी बोलतांना सौ.गडाख पुढे म्हणाल्या की,शंकरराव गडाख नामदार झाल्यानंतर खुप कामे मार्गी लागलेले आहे हक्काचा माणुस मंञालयात गेल्याने तालुक्याच्या विकासासाठी

निधीची कमरता नाही .मुकिंदपूर गावांचा गट नंबर ७६ मधील वनविभागाच्या जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी नामदार गडाख यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे जागेचा मोठा प्रश्न सोडविण्यात यश येणार आहे .

तसेच जिल्हा परिषदेचे अर्थ व पशु संवर्धन समितीचे सभापती सुनिल गडाख यांनी विकास कामाचा मोठा दणका सुरु केलेला आहे तालुक्यातील देवस्थानच्या विकासात मोठी भर घालण्याचे काम करुन

मोठा अर्थिक निधी तालुक्याला मिळत असल्याचे समाधानही यावेळी सौ.गडाख यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी पांडूरंग निपुंगे,कल्याणराव उभेदळ,सनिभाऊ पाटोळे,दत्तूभाऊ शिरसाठ,सुनिल सवई,महेश निपुंगे,

अशिष मते,संतोष साळवे,बाबासाहेब साळवे,निलेश निपुंगे,अॅड अशोक करकड,माजी सरपंच संजय कराडे,राजू करडक,वैभव मगर,रमेश कांडके, अमित मेहर,कानिफ उपळकर,विशाल तिवारी,पापाभाई शेख,भैय्या डावखर यांच्यासह

ग्रामपंचायतीचे आजी – माजी सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सुञसंचालन रेवननाथ पवार यांनी केले तर अभार ग्रामसेवक संतोष खंडागळे यांनी मानले.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!