माय महाराष्ट्र न्यूज:हवामान खात्याच्या माहितीनुसार मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत मान्सून केरळात धडकणार आहे.
तर 5 जूनला कोकणात आणि 7 जूनला मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे यामुळे मुंबई करांना यंदा मान्सूनचा लवकरच आनंद घेता येणार आहे.
मान्सूनच्या प्रवास योग्य दिशेने सुरू असल्याने 3 ते 9 जूनदरम्यान मान्सूनचे राज्यात आगमन होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर 10 ते 16 जूनदरम्यान मुसळधार
पाऊस बरसेल असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून नियोजित वेळेच्या एक आठवडा अगोदर २२ मे ऐवजी १५ मे रोजी
अंदमान निकोबार बेटांवर पोहोचला. आता केरळमध्ये २७ मेपर्यंत आणि त्यानंतर मुंबईत ५ ते ६ जूनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. अशात हवामानतज्ज्ञ
दिनेश मिश्रा यांनी सांगितले की, मान्सूनचा आतापर्यंत प्रवास चांगला राहिल्यामुळे 20 ते 22 मे रोजी मुंबईत मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे.राज्यातील काही भागात कालपासून
जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे दरम्यान हा पाऊस कदाचीत हुलकावणी देण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पाऊस असल्याने
कदाचित हा पाऊस थांबल्यानंतर पुढचे काही दिवस पाऊस नाही लागल्यास पेरणी केलेल्या पिकाचे मोठे नुकसान होते. यासाठी आज कृषी मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना आवाहनही केले.