माय महाराष्ट्र न्यूज:नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर सावरगाव नजीक काळेवाडी शिवारात मारूती कारचा अपघात झाला.
यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिष लोंढे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यात राहुल पंढरीनाथ गोडसे (रा. गोडसेवाडी),
ऋषीकेश साहेबराव ओटी (रा. व्हरोंडी) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत राहुल गोडसे या तरूणाला फीट
आल्याने त्याला बुधवारी (दि. 25) सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास टाकळी ढोकेश्वर येथे रुग्णालयात घेऊन जात असताना मारूती कार पलटी झाली यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर
जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली.मृतदेहांवर टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
पुढील तपास पो. हेड कॉ. विलास लोणारे, पो. ना. एन. पी. साळवे, श्रीनाथ गवळी, पी. सी. शिंदे, अभी जाधव करत आहेत.
दोन दिवसांपुर्वीच येथेच काळेवाडी परिसरात अपघात होऊन एका व्यक्तिचा मृत्यू झाला होता. आज लगेचच दुसरा अपघात होऊन दोन ठार झाल्याने चितेंचा विषय झाला आहे.