माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत गुरूवारी 1332 क्विंटल लुज कांद्याची आवक झाली. प्रतिक्विंटलला जास्तीत
जास्त 1352 रुपये भाव मिळाला तर सोयाबीनला 6406 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.राहाता बाजार समितीत गुरूवारी पहिल्या दिवशी 70 ते 80 ट्रॅक्टर ट्रॅालीमधून 1332 क्विंटल
कांदा दाखल झाला. कांदा नंबर 1 ला 950 ते 1352 रुपये इतका भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 500 ते 900 रुपये, कांदा नंबर 3 ला 100 ते 450 रुपये भाव मिळाला.
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या भावात वाढ सुरुच असून बुधवारी
भावात आणखी 100 रुपयांनी वाढ झाल्याने जास्तीत जास्त भाव 1450 रुपयांपर्यंत निघाला. आवकेतही जवळपास 4 हजार गोण्यांनी वाढ झाली. एकूण 39 हजार 702 गोण्या (21 हजार 689 क्विंटल) इतकी वाढ झाली.
एक-दोन लॉटला 1200 ते 1450 रुपयांचा भाव मिळाला. मोठा कलरपत्ती कांद्याला 1100 ते 1250 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1000 ते 1050 रुपये, गोल्टा कांद्याला 900 ते 1000 रुपये,
गोल्टी कांद्याला 300 ते 700 रुपये, जोड कांद्याला 200 ते 450 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला 100 ते 400 रुपयांपर्यंत भाव मिळाला.
दरम्यान खर्चाच्या प्रमाणात उत्पादीत मालाला भाव मिळाला नाही तर शेतकरी आर्थिक अडचडीत येत आहे. शिवाय सरकारने कांद्याची निर्यातबंदी केल्यामुळे कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे.
मजुरांनाही मजुरी मिळणे अवघड झाले आहे. कांदा साठविणे अडचणीचे होत असून जोपर्यंत योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत कांदा टिकवून ठेवणे देखील अवघड आहे. अल्प भुधारक
शेतकरी मोठ्या आर्थिक संकाटात आला आहे. शासनाने कांद्याची निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.