Sunday, July 3, 2022

सर्वात मोठी बातमी:देशात समान नागरी कायदा लवकरच, हालचालींना वेग

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं दमदार पाऊल टाकलंय. उत्तराखंडमध्ये समिती स्थापन झाली

असून तिचा अहवाल येताच कायद्याचा मसुदा तयार होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.सर्वात मोठी बातमी:देशात समान नागरी कायदा लवकरच, हालचालींना वेग

देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचालींनी वेग घेतलाय. याचा प्रयोग सर्वप्रथम भाजपशासित उत्तराखंडमध्ये केला जाणार आहे.

केंद्र सरकारनं उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्यासाठी 5 सदस्यीय समिती तयार केली असून सर्वेक्षणला हिरवा कंदील दाखवण्यात आलाय. या समितीच्या अहवालावर आधारित कायदा

अस्तित्वात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर लग्नाचं वय, घटस्फोट, दत्तकविधान, मुलांची कस्टडी, पोषण भत्ता, वारसा हक्क, कौटुंबीक संपत्तीची वाटणी,

देणग्या या सर्व बाबी देशाच्या प्रत्येक नागरिकाला समान राहतील.नवा कायदा लागू झाल्यानंतर हिंदू विवाह कायदा, हिंदू कुटुंब कायदा, मुस्लिम पर्सनल लॉ, पारसी लॉ, इसाई लॉ किंवा

अल्पसंख्याक धर्मांचे अन्य कायदे रद्दबातल होतील आणि त्याजागी एकच कायदा अस्तित्वात येईल.सुरूवातीला काही राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू केला जाईल. कालांतरानं

संसदेत कायदा संमत होऊन राज्यांचे कायदे केंद्रीय कायद्यात विलीन होतील, अशी माहिती सूत्रांनी दिलीये. भारतीय राज्यघटना तयार करतानाही या कायद्याचा विचार झाला होता.

शिवाय सुप्रीम कोर्टानंही वेळोवेळी अशा समान कायद्याची गरज बोलून दाखवलीये. मात्र जमियत उलेमा ए हिंदनं याला विरोध केलाय. देवबंद इथं झालेल्या जमियतच्या परिषदेमध्ये याविरोधात

ठराव करण्यात आलाय. पर्सनल लॉमध्ये बदल हे घटनेच्या कलम 25मधील वचनाचा भंग असल्याचं या ठरावात म्हटलंय.भाजपच्या निवडणूक शपथपत्रात समान नागरी कायद्याचं

आश्वासन देण्यात आलंय. आतापर्यंत मोदी सरकारनं CAA, अनुच्छेद 370 हटवणं, तीन तलाक बंद करणं, राममंदिर ही आश्वासनं पूर्ण केलीयेत. आता समान नागरी कायदा अस्तित्वात

आणून आणखी एक मोठी मजल मारण्याचा या सरकारचा इरादा स्पष्ट आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!