Saturday, July 2, 2022

ज्ञानेश्वर”कारखाना 16 लाख 61 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून  राज्यात तिसऱ्या स्थानावर-माजी आ. नरेंद्र घुले पाटिल

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने यंदाचा 48 व्या  गळीत हंगामात आज पर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढून 16 लाख 61 हजार  मेट्रिक

टन ऊसाचे उच्चांकी गाळप केले. ऊस गाळपात सहकारी कारखान्यामध्ये ज्ञानेश्वर राज्यात तिसरा क्रमांकावर असल्याची माहिती  कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी दिली आहे .

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील   लोकनेते मारूतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 48 व्या गळीत हंगामाची सांगता कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले

पाटील यांचे हस्ते ऊस गव्हाणीची विधीवत पूजा करून झाली. यावेळी कारखान्याचे संचालक माजी आमदार चंदशेखर घुले पाटील,कारखान्याचे उपाघ्यक्ष माजी  आमदार पांडुरंग अभंग,

तज्ञ संचालक डॉ.क्षितिज घुले पाटील,जेष्ठ संचालक  अँड.देसाई देशमुख,काकासाहेब नरवडे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष  विठ्ठलराव लंघे,कार्यकारी संचालक  अनिल शेवाळे,सचिव रवींद्र मोटे व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री.घुले पुढे म्हणाले सहवीज निर्मिती प्रकल्पातून 11 कोटी 61 लाख 32 हजार 133 युनिट वीज निर्मिती झाली. त्यापैकी 7 कोटी 4 लाख 51 हजार 320 युनिट वीज महावितरण कंपनीला निर्यात केली.

आज अखेर ऑइल कंपन्यांना 80 लाख लिटर इथेनॉलचा पुरवठा ही करण्यात आलेला आहे.पुढील हंगाम 15 ऑक्टोबरला सुरू होईल या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे.

श्री.पांडुरंग अभंग म्हणाले कार्यक्षेत्रातील सर्व ऊसाचे गाळप केले आहे.हंगाम लांबणीवर गेल्यास आणि उन्हाची तीव्रता वाढल्यास शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी पैसे द्यावे लागतात त्यासाठीग ळीत हंगाम 180 दिवसाचाच असला पाहिजे.पुढील हंगामात प्रतिदिन 10 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप होण्याचे दृष्टीने गाळप क्षमतेत वाढ करण्यात येणार आहे.केवळ साखरेवर अवलंबून न राहाता प्रतिदिन 45 हजार लिटर क्षमतेचीनवीन डिस्टिलरी व प्रतिदिन 50 हजार लिटर क्षमतेचा नवीन इथेनॉल प्रकल्प हाती घेण्यात आला.

कार्यकारी संचालक अनिल शेवाळे म्हणाले कार्यक्षेत्रात 21 लाख टन ऊस उपलब्ध होता.या हंगामात 16 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट होते ते पूर्ण करून 220 दिवसात 16 लाख 61 हजार मेट्रिक टन ऊस गाळप झाले. 13 लाख 78 हजार 500 क्विंटल पांढरी साखर तर 3 लाख 20 हजार 500 क्विंटल रॉ शुगर उत्पादित केली. देशात उत्पादित होणारी अतिरिक्त साखर

उत्पादनाला केंद्र सरकारने दिलेल्या सर्व पर्यायांचा आपण वापर करून साखर निर्यात केली.रॉ-शुगर तयार करण्यात आली. बी-हेव्ही मोलासेस पासून इथेनॉल निर्मिती करण्यात येत आहे.संचालक मंडळाचे

मार्गदर्शन,शेतकी विभाग, कामगार, अधिकारी , ऊसतोड कामगार ,मुकादम, संचालक मंडळ तसेच ऊस उत्पादक शेतकरी यांच्या सर्वांच्या सहकार्यामूळेच हे शक्य झाले.

कारखान्याचे संचालक काशिनाथ नवले, काकासाहेब शिंदे, प्रा.नारायण म्हस्के,गोरक्षनाथ गंडाळ,भाऊसाहेब कांगुणे, जनार्धन कदम,शिवाजी कोलते,मच्छिद्र म्हस्के,पंडितराव भोसले, बबनराव भुसारी,सखाराम लव्हाळे,दीपक नन्नवरे,लक्ष्मण पावसे,

विष्णू जगदाळे,बबनराव भुसारी,अशोकराव मिसाळ,दादासाहेब गंडाळ,संचालिका सौ.लताताई मिसाळ,कामगार संचालक सुखदेव फुलारी,नेवासा बाजार समितीचे सभापती डॉ.शिवाजी शिंदे, तुकाराम मिसाळ,जिल्हा परिषद

सदस्य दत्तात्रय काळे,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रभाकर कोलते, जनार्दन पटारे, गणेशराव गव्हाणे, अंबादास कळमकर, बबनराव जगदाळे,मिलिंद कुलकर्णी, भय्यासाहेब देशमुख, दत्तात्रय खाटीक,भीमराज शेंडे,मोहनराव देशमुख, मोहनराव गायकवाड,

घुले पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव धस, संभाजी, माळवदे,काकासाहेब लबडे,कृष्णा उगले, अण्णासाहेब गर्जे,अंकुश दाभाडे,रामभाऊ पाउलबुद्धे ,भानुदास कावरे,भाऊसाहेब चौधरी,अशोक वायकर, डॉ.अशोकराव ढगे,हुकूमबाबा नवले,

देविदास साळुंके,सोपान महापूर,अंबादास कळमकर,राजू परसैय्य, नामदेव निकम, कारखान्याचे तांत्रिक सल्लागार एम.एस.मुरकुटे, एस.डी. चौधरी,महेंद्र पवार,चिफ इंजिनिअर राहुल पाटील,शेतकी अधिकारी सुरेश आहेर,

स्टोअर किपर नामदेव मुळे,कामगार कल्याण अधिकारी  बाळासाहेब डोहाळे,कारभारी गायके,कल्याणराव म्हस्के,विलास लोखंडे आदी उपस्थित होते.भाऊसाहेब सावंत यांनी सूत्र संचालन केले. संचालक पंडितराव भोसले यांनी आभार मानले.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!