Thursday, June 30, 2022

मंत्री बाळासाहेब थोरात राजीनामा देण्याच्या मनस्थितीत ?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:या घडीला काँग्रेसच्या गोटातली आणखी एक धक्कादायक बातमी. विधानपरिषदेच्या निकालानंतर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी, धुसफूसही उघड व्हायला लागली आहे.

बाळासाहेब थोरात हे विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी, काल आमदारांची फूट यावरुन बाळासाहेब

थोरात नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. थोरात काँग्रेस विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देण्याची सूत्रांची माहिती आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत आमच्या आमदारांचीच

काही मते आम्हाला मिळाली नाहीत, हे मान्य करावे लागेल. माझी भावना पक्षश्रेष्ठींना कळविणार आहे. या स्थितीत महाविकास आघाडी म्हणूनदेखील विचार करावा लागणार आहे.

सरकारला अडीच वर्षे झाली आहे. त्यामुळे सरकार म्हणून आम्हाला विचार करावा लागणार आहे, असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. या निकालामुळे नाराज झालेले महसूलमंत्री

थोरात हे राजीनामा देऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.बाळासाहेब थोरात हे महसूलमंत्री आणि काॅंग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचे नेते आहेत. त्यापैकी ते कशाचा राजीनामा देणार, याबाबत अद्याप त्यांनी ठरविलेले नाही.

कॉंग्रेसची मते फुटल्याचे मान्य करत स्वत: बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘ मते फुटली याची सर्व जबाबदारी आम्हा सर्वांची आहे. यावर आम्ही निश्‍चितपणे विचार करू.

पक्ष म्हणून आमचा दोष आहे. इतरांना दोष देण्यात अर्थ नाही. मात्र, महाविकास आघाडी म्हणून विचार करण्याची गरज आहे. सरकार म्हणूनदेखील यावर विचार करण्याची गरज आहे.

कॉंग्रेसची स्वत:ची ४४ मते असताना कॉंग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे व भाई जगताप यांना अनुक्रमे २२ व १९ मते मिळाली.पहिल्या पसंतीक्रमात हंडोरे यांना २६ मतेदेखील मिळविता

आली नाहीत. परिणामी दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांमध्ये कॉंग्रेसचे भाई जगताप विजयी झाले तर हंडोरे यांना पराभव पत्करावा लागला.भाजपाचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड विजयी झाले.

या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाने सलग दुसऱ्यांदा महाविकास आघाडीचा पराभव केल्याचे स्पष्ट झाले. या निकालानंतर काॅंग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. दलित उमेदवार

हंडोरे यांना पक्षांतर्गत गटबाजीमुळे पाडल्याचा आरोप माजी खासदार संजय निरूपम यांनी केला. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे निकालाआधीच नागपूरला निघून गेले. तेव्हाच काॅंग्रेस धोक्यात असल्याची चर्चा होती.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!