माय महाराष्ट्र न्यूज:शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेले बंड अखेर यशस्वी झाल्यात जमा आहे. तब्बल ४६ आमदार
शिंदेंनी आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार शेवटच्या घटका मोजत आहे. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार
असल्याची माहिती समोर आली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. हीच बैठक आज अखेरची बैठक असल्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये
सर्व मंत्र्यांना उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार अशी माहिती देणार आहे. त्यानंतर ते आपला राजीनामा देणार आहे, असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधातच मोठे बंड पुकारले आहे. सर्व आमदारांना घेऊन शिंदे हे आता गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ३३ आमदारांची
फौज आहे. एकनाथ शिंदे हे आज राज्यपालांना भेटून प्रस्ताव देण्याची शक्यता आहे. त्यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हात आता खाली टेकले आहे.महाराष्ट्रातील राजकीय
घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने, असं म्हणत संजय राऊत यांनी ठाकरे सरकारच्या अस्ताचे संकेत दिले आहे.