Sunday, July 3, 2022

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी: मुख्यमंत्री ठाकरेंनी राजीनामा देण्याविषयी मोठं विधान

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मी मुख्यमंत्रीपदाच्या लायक नसल्याचे समोर येऊन सांगा. राजीनामा तयार आहे, असे म्हणत बुधवारी मुख्यमंत्री आणि शिवसेना

प्रमुख उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना साद घातली. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर त्यांनी आपली भूमिका फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून विशद केली.

शिवसेना हिंदुत्वापासून आणि हिंदुंत्व शिवसेनेपासून दूर होऊ शकत नाही. विधान भवनात हिंदुत्वाबाबत बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे. ही शिवसेना

बाळासाहेबांची नाही असे भासवण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. बाळासाहेबांच्या नंतरच्या शिवसेनेनी तुम्हाला खूप काही गेले हे लक्षात ठेवा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

शस्त्रक्रियेमुळे भेटू शकत नव्हतो. शिवसेना आणि हिंदुत्व एकमेकांशी जोडलेले शब्द. हो दोन्ही शब्द कदापिही एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी

आदित्य, एकनाथ शिंदे सारे अयोध्येला गेले. हिंदुत्वावार बोलण्याची ही वेळ नाही. मग नेमके झाले काय, ही शिवसेना कोणाची. काही जण ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही म्हणतात.

ठीक आहे. असं मी काय केलंय. त्यावेळेला जे विचार होते, तेच मी पुढे नेतोय. 2014 साली प्रतिकूल परिस्थितीत 63 आमदार निवडून आणले. पहिल्या प्रथम शिवसेना कोणाची, हिंदुत्व

सोडले का, मधल्या काळात जे काही दिले, ते बाळासाहेबानंतर शिवसेनेने दिले.सध्या राज्यात काय चाललंय. काही सूरतला गेले. त्यानंतर गुवाहटीला गेले. काल परवा

विधान परिषदेची निवडणूक झाली. या निवडणुकीच्या अधल्या दिवशी सगळे आमदार हॉटेलमध्ये होते. मी तिकडे गेलो. ज्यांना आपले मानतो. आपली माणसं यांना एकत्र ठेवावे लागते.

शंका ठीक आणि लघुशंकेला गेले तर शंका. ही कसली लोकशाही.साधा महापालिकेत उभा न राहिलेला माणूस मुख्यमंत्री कसा होणार हा प्रश्न मी पवारांना विचारला. पण त्यांनी आग्रह केला.

मग म्हटलं, ठीक आहे होऊयात. राजकारण हे राजकारण असलं पाहिजे. वळणदार राजकारण रडकुंडीच्या घाटासारखं असू नये. प्रशासनाने मला सांभाळून घेतलं. मला धक्का कशाचा

बसला आहे? तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने म्हटले की, आम्हाला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे नकोयत, तर एक वेळ ठीक आहे. आज कमलनाथ यांनी स्वत: फोन करून म्हटले की, उद्धवजी आम्ही

तुमच्यासोबत आहोत. पण माझ्याच लोकांना मी नको आहे, त्याला काय म्हणावं?आजही या लोकांपैकी एकानेही सांगितले की, उद्धवजी आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नको आहात, तर मी

आजच वर्षा सोडून मातोश्रीवर जायला तयार आहे. त्यांनी हे समोर येऊन बोलावे, उगाचं शिवसेनेला आम्ही सोडणार नाही, हिंदुत्वाचा मुद्दा असे याच्या त्याच्या पाशी सांगू नये. मी सत्तेला चिकटून

बसणारा माणूस नाही. मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे. मला सत्तेचा मोह नाही. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशी एक म्हण आहे, तशीच परिस्थिती आता आली आहे असे ठाकरे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!