Thursday, August 11, 2022

देवगड येथील श्री समर्थ सदगुरू श्रीकिसनगिरीबाबांच्या नगर प्रदक्षिणा दिंडीचे पंढरपूरमध्ये उत्स्फूर्त स्वागत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी पंढरपूरमध्ये काढण्यात आलेल्या श्री समर्थ सदगुरू किसनगिरी

बाबांच्या पादुका पालखी दिंडीचे पंढरपूर येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. “ज्ञानोबा माऊली तुकाराम””श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा की जय” असा जयघोष करत निघालेली नगर प्रदक्षिणा दिंडी ही

पंढरपूरमध्ये आलेल्या वारकऱ्यांचे आकर्षण ठरली होती.सुमारे दीड हजार भाविकांचा नगर प्रदक्षिणा दिंडीत सहभाग घेतला.यावेळी “ज्ञानोबा तुकाराम”च्या जयघोषाने पंढरपूर नगरी दुमदुमली श्री क्षेत्र पंढरपूर येथील देवगडच्या भक्त

निवास मठापासून नगर प्रदक्षिणा पादुका पालखी दिंडीस रविवारी दि.३ जुलै रोजी दुपारी ४ वाजता महंत गुरुवर्य श्री भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व देवगड संस्थानचे

उत्तराधिकारी महंत स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज,शेलोडी येथील जागृती आश्रमाचे प्रमुख महंत भागवताचार्य शंकरजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला.अग्रभागी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत हरिनामाचा जयघोष करत

चाललेले झेंडेकरी पथक,त्यामागे पुरुष भाविक,ज्ञानोबा तुकाराम चा जयघोष करणारे भजनी व टाळकरी मंडळ,ट्रक्टर ट्रॉलीमध्ये पुष्पांनी सजवलेली श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांची पादुका पालखी त्यामागे डोक्यावर तुळशी कलश घेतलेल्या

महिला भाविक असे या दिंडीचे स्वरूप होते.नगर प्रदक्षिणा दिंडी विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आली असता गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते पंचारती ओवाळून आरती करण्यात आली त्यानंतर

शिरसाष्टांग वंदन करून गुरुवर्य श्री भास्करगिरीबाबांनी विठुरायाचे दर्शन घेतले.राज्यात शिस्तबद्ध व आदर्शवत दिंडी म्हणून नावलौकिक असलेल्या देवगडच्या पादुका पालखी दिंडीचे तीर्थक्षेत्र

पंढरपूर नगरीमध्ये आगमन होताच पुष्पवृष्टी करत या दिंडीचे पंढरपूरकरवासीयांनी स्वागत केले.विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो वारकऱ्यांनी श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पादुकांचे यावेळी दर्शन घेतले.नगर प्रदक्षिणेसाठी आलेल्या

पालखीने पंढरपूरसह येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिराला ग्रामप्रदक्षिणा घातली.यावेळी झालेल्या नगरप्रदक्षिणा दिंडी प्रसंगी पंढरपूर येथील भाविकांनी स्वागत करून गुरुवर्य भास्करगिरी बाबांसह स्वामी प्रकाशानंदगिरी बाबांचे संतपूजन केले.

तर यावेळी निघालेल्या ग्रामप्रदक्षिणा शोभायात्रा दिंडी मिरवणुकीत अनेक संत महंत टाळकरी कीर्तनकार भजनी यांच्यासह सुमारे दीड हजार भाविक सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!