Wednesday, August 17, 2022

लोकनेते मारुतराव घुले पाटलांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले-शिवाजी महाराज देशमुख

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा/सुखदेव फुलारी

साखर कारखाना व जिल्हा बँकेच्या माध्यमातून मदत करून लोकनेते मारुतराव घुलेपाटलांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम केले आहे असे प्रतिपादन श्रीक्षेत्र नेवासा येथील ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त  शिवाजी महाराज देशमुख यांनी केले.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांना 20
व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात देशमुख महाराज बोलत होते.प्रारंभी श्रीक्षेत्र ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे विश्वस्त शिवाजी महाराज देशमुख, कारखाना व उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,अड.देसाई देशमुख,शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितिज घुले पाटील, संचालक काकासाहेब नरवडे,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष काशिनाथ नवले,विशेष लेखापरीक्षक राजेंद्र देशमुख,राज्य साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,सचिव रवींद्र मोटे आदींनी स्व.घुले पाटील यांचे स्मृतिस्थळावर पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

शिवाजी महाराज देशमुख  म्हणाले,साहेब देहाने आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्याने त्यांनी सर्वांच्या अंतःकरणात घर केलेले आहे.त्यांच्या कार्याची,स्वभावाची व सामाजिक कार्याची उंची फार मोठी आहे.साहेबांचे कार्य सागरा सारखे विशाल आहे.जायकवाडी धरण होण्यापूर्वीची अनुकूल-प्रतिकूल परिस्थितीत मदतीचा हात देऊन शेतकरी व धरणग्रस्तांचे जीवन आनंदी करण्याचे काम त्यांनी केले. तळागाळातील,सर्व धर्मिय माणसाला आधार देत सर्वांना बरोबर घेऊन चालले.त्यांनी राजसत्ता-धर्मसत्ता दोन्ही सांभाळल्या.त्यांच्या संगतीत आलेल्या सर्वांना त्यांनी सामावून घेतले.कोणताही दुजाभाव केला नाही.
परोपकारी जीवन जगले.अनेकांचे संसार फुलविण्याचे काम त्यांनी केले. ज्ञानेश्वर माऊली आणि साहेब यांच धर्मसत्ता-राजसत्तेच नात वै. बंशी महाराज तांबे यांनी जोडलेल आहे.बन्सी महाराज तांबे यांच्यामुळे कारखाना मशीनरीचा पहिला ट्रक ज्ञानेश्वर मंदिरात पूजा करून नंतर कारखान्याची उभारणी केली.संत ज्ञानेश्वरांच्या

हे विश्वची माझे घर | ऐसी मती जयाचीस्थिर किंबहुना चराचर | आपणची जाहला ||
“नगरेची रचावी|जलाशये निर्मावी| महावने लावावी|नानाविधे|” या ओव्यांप्रमाणे घुले पाटील आपले जीवन जगले.

यावेळी मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर,माजी उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे, जिल्हा परिषेदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे,कृषी समितीचे माजी सभापती दिलीपराव लांडे,अशोक कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दिगंबर शिंदे, संचालक पंडितराव भोसले,बबनराव भुसारी,जनार्दन कदम,शिवाजी कोलते,अशोकराव मिसाळ,बबनराव भुसारी,मच्छीन्द्र म्हस्के,कामगार संचालक सुखदेव फुलारी,जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे,बाजार समितीचे सभापती डॉ.शिवाजीराव शिंदे,गणेशराव गव्हाणे,निवृत्ती दातीर, रामभाऊ जगताप,महंमद आतार, काशिनाथ नवले, संजय कोळगे,जनार्दन पटारे, दादासाहेब गंडाळ,अजित मुरकुटे, अड.बाळासाहेब शिंदे, राजाजी बुधवंत,बाळासाहेब नवले, बाळासाहेब पाटील, शिवाजी भुसारी,भेंडा खुर्दचे सरपंच सुनील खरात,सोसायटी अध्यक्ष रवींद्र नवले,विजयकुमार नवले,हरिभाऊ नवले,अनिल मडके,बाजीराव मुंगसे, घुले पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव धस,अशोक वायकर, नामदेव निकम,अड.रवींद्र गव्हाणे,जनार्दन कदम, दत्तात्रय खाटीक, बाळासाहेब धस,वामनराव मापारे,रामदास गोल्हार, कचरदास गुंदेचा, सरपंच उभेदळ,हंडीनिंमगावचे सरपंच अण्णासाहेब जावळे,भारत गरड, शेषराव साबळे ,कृष्णा पायघन, ताहीर पटेल,अरुण लांडे, संजय फडके, अड.शिवाजी दसपुते, अंबादास कळमकर, भीमराज शेंडे, मारुतराव थोरात,मिलिंद कुलकर्णी, सुधाकर लांडे, शिवाजीराव गवळी, बाळासाहेब भणगे, माजी उपसभापती किशोर जोजर, तुकाराम काळे मामा, जनार्दन शेळके, अमोल अभंग, गफूर बागवान, सुभाष पवार, भरत वांढेकर, राजेंद्र ढमढेरे,अड.सदाशिव आरगडे,शिवाजी चिंधे, भास्कर खेडकर,अड. अण्णासाहेब अंबाडे, संभाजी माळवदे,जनाभाऊ कदम,गोरक्षनाथ कापसे, भानुदास कावरे,भाऊसाहेब चौधरी,कारखान्याचे तांत्रिक सल्लागार एम.एस. मुरकुटे, आप्पासाहेब खरड,एस.डी. चौधरी,महेंद्र पवार,शेतकी अधिकारी सुरेश आहेर,मुख्य अभियंता राहुल पाटील,कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे,प्रशासकीय अधिकारी कारभारी गायके,जनसंपर्क अधिकारी कल्याणराव म्हस्के,बाळासाहेब आरगडे,विलास लोखंडे आदी उपस्थित होते.

यावेळी संगीत अलंकार शंकरगिरी महाराज (अंबड) व संगीत अलंकार प्रकाश महाराज कातकडे यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम झाला.

भाऊसाहेब सावंत यांनी सूत्रसंचालन केले.कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!