Wednesday, August 17, 2022

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात घसरण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर येथील पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत आषाढी एकादशीनिमित्त रविवार ता.10 जुलै रोजी कांद्याच्या आवकामध्ये

कमालीची घट झाली आहे. शेतकऱ्यांनी 2 हजार 56 कांदा गोण्याची विक्रीसाठी आणल्या होत्या. मात्र, आज आषाढीमुळे कांद्याच्या आवकेवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.

मागील आठवड्यात 3 जुलै रोजी पारनेर बाजार समिती 3 हजार 537 कांदा गोण्यांची आवक झाली होती. त्या तुलनेत आज दीड हजार कांदा गोण्यांची आवक घटली. पारनेर बाजार

समितीमध्ये रविवारी झालेल्या लिलावात 7 ते 8 लॉटला सर्वाधिक प्रतिक्विंटल 1500 ते 1800 रुपये भाव मिळाला. एक नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल 1000 ते 1400 रुपये भाव मिळाला, अशी माहिती

पारनेर बाजार समितीचे सचिव शिवाजी पानसरे यांनी दिली.सध्या खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. अनेक शेतकरी पंढरीच्या वारीला गेले आहेत. आज आषाढी एकादशी

असून सध्या भाव कमी असल्याने शेतकरी कांदा विक्रीसाठी काढताना दिसत नाहीत. अहमदनगर जिल्ह्यात मागील रब्बी हंगामात 1 लाख 90 हजार 529 हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती.

यातून जिल्ह्यात 37 लाख 98 हजार 195 टन कांद्याचे उत्पादन झाले होते. परंतु कांद्याच्या भावात घट झाल्यामुळे शेतकरी कांदा विक्रीसाठी काढत नसल्याचे चित्र आहे.पारनेर बाजार

समितीमध्ये रविवारी कांद्याचे लिलाव झाली. यावेळी सुमारे 2 हजार 56 कांदा गोण्यांची आवक झाली होती. रविवारी झालेल्या लिलावात 7 ते 8 लॉटला प्रतिक्विंटल सर्वाधिक म्हणजे 1500 ते 1800

रुपये भाव मिळाला. एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल 1000 ते 1400 रुपये भाव मिळाला, तर दोन नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल 700 ते 900 रुपये भाव मिळाला, तर तीन नंबर कांद्याला

प्रतिक्विंटल 200 ते 600 रुपये भाव मिळाला, अशी माहिती पारनेर बाजार समितीचे सचिव शिवाजी पानसरे यांनी दिली.खरिपातील कांद्याची लागवड घटली असून, चालू खरीप हंगामात

नगर जिल्ह्यात सुमारे अवघ्या 1997 हेक्टरवर कांदा पिकाची लागवड झाली आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याच्या भावात घट झाल्यामुळे खरीप हंगामातील कांदा लागवडीत घट

झाल्याचे दिसून येत आहे. कांद्याच्या भावात वाढ झाल्यास रब्बी हंगामातील कांदा लागवडीत वाढ होऊ शकते.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!