Thursday, August 11, 2022

मतदार यादीसोबत आधार लिंक करण्याचे नेवासा तहसीलदारांचे आवाहन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

भारत निवडणुक आयोग यांचे आदेशानुसार औपचारिकरीत्या मतदार यादीसोबत आधार लिंक करण्याची प्रक्रिया दि.१ ऑगस्ट पासून सुरू होत असून तालुक्यातील मतदारांनी आपला आधार क्रमांक मतदार यादीसोबत जोडून घ्यावा असे आवाहन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केले आहे.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम २३ मधील तरतुदीनुसार मतदार यादीतील विद्यमान मतदारांना त्यांच्या आधार क्रमांक भरण्यासाठी मतदार नोंदणी नियम १९६० मधील नियम २६ ब मध्ये नमुना अर्ज क्र. ६ब तयार करण्यात आला आहे. अर्ज क्र. ६ ब भारत निवडणुक आयोगाच्या आणि मुख्य निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल, तसेच, मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. ६ ब ERO Net, GARUDA, NVSP VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध असेल. तसेच अर्ज क्र. ६ च्या छापील प्रती देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) नियुक्ती मतदार नोंदणी अधिकारी करतील. सदर अर्ज क्र. ६ब प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून सात दिवसाच्या आत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेद्वारा GARUDA किंवा ERO Net मध्ये संगणकीकरण करतील.

*आधार क्रमांक देणे पूर्णपणे ऐच्छिक आहे…*

मतदार नोंदणी अधिकारी मतदारांना हे स्पष्ट करतील की आधार क्रमांक मिळवण्याचा उद्देश मतदार यादीतील त्याच्या नोंदींचे प्रमाणीकरण करणे आणि भविष्यात त्यांना अधिक चांगली निवडणूक सेवा प्रदान करणे हा आहे. जर मतदाराकडे आधार क्रमांक नसेल आणि त्यामुळे त्याचा/तिचा आधार क्रमांक सादर करता येत नसेल, तर मतदाराला नमुना अर्ज क्र. ६ मध्ये नमूद केलेल्या अकरा पर्यायी कागदपत्रांपैकी कोणत्याही एक दस्तावेज सादर करण्यास सांगावे.
मतदार यादीतील कोणत्याही विद्यमान मतदाराचा आधार क्रमाक सादर करण्यास/ आधार देण्यास असमर्थतेच्या आधारावर मतदार नोंदणी अधिकारी मतदार यादीतील कोणतीही नोंद वगळता येणार नाही.

मतदार यादीशी आधार क्रमांक लिंक करावयाचा कार्यक्रम भारत निवडणुक आयोग यांचे आदेशानुसार औपचारिकरीत्या दि. १ ऑगस्ट २०२२ पासुन सुरु होत आहे. सदर कार्यक्रमानुसार नेवासा तालुक्यातील सर्व नागरीकांनी आपला आधार क्रमांक मतदार यादीसोबत लिंक करुन घ्यावा असे आवाहन तहसिलदार रुपेशकुमार सुराणा व निवडणुक नायब तहसिलदार किशोर सानप यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!