नेवासा/सुखदेव फुलारी
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांचे नवीन पॅनेल बनविणेसाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षेसाठी प्राप्त झालेल्या एकूण अर्जापैकी इंदलकर समितीच्या आकृतिबंधामध्ये पद बसत नसल्याचे कारण देत १९० उमेदवार अपात्र ठरविण्यात आले आहेत.
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांचे नवीन पॅनेल बनविणेकरिता शासन मान्यते नुसार जाहिरात दि. ३१/०५/२०२२ रोजी वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान, पुणे-४११००७ या संस्थेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पदाकरीता दि.०१/०६/२०२२ ते दि.३०/०६/२०२२ अखेर उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी नियुक्त समितीने केली.
ज्या कारणास्तव उमेदवारांचे अर्ज अपात्र करण्यात आले आहेत त्याचे स्पष्टीकरण देत अपात्र उमेदवारांची
यादी वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान, पुणे यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्याचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.
ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून बहुतांश उमेदवारांना
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील शासन निर्णय क्र. ससाका /२०१४/प्र. क्र.३७/२५
स, दि.१३/०३/२०२० अन्वये इंदलकर समितीने सहकारी साखर कारखान्यांसाठी गठीत केलेल्या सुधारित आकृतीबंधांची अंमलबजावणी करणेबाबत निर्देश देण्यात आलेले असून,इंदलकर समितीने सुचविलेल्या आकृतीबंधानुसार उमेदराने अर्जात नमूद केलेले पद विभागप्रमुख/ खातेप्रमुख नसल्याने सदर अर्ज अपात्र करण्यात येत आहे.किंवा अर्जदाराने त्यांचे अर्जात आवश्यक असलेली संपूर्ण माहिती भरलेली नसल्यामुळे व आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यामुळे सदर अर्ज अपात्र करण्यात येत आहे,किमान शैक्षणिक पात्रता नसने,अनुभवी उमेदवाराला किमान पाच वर्षांचा खाते प्रमुख म्हणून काम केलेचा अनुभव नसने अशी अपात्रतेची कारणे दिली आहेत.
साखर आयुक्तालयाचे संचालक (प्रशासन) उत्तमराव
इंदलकर समितीने सहकारी साखर कारखान्यांसाठी गठीत केलेल्या सुधारित आकृतीबंधांमध्ये खाते प्रमुख-विभाग प्रमुखांची व्याख्या करतांना केवळ जनरल मॅनेजर किंवा सेक्रेटरी,वर्क्स मॅनेजर किंवा चीफ इंजिनिअर,प्रॉडक्शन मॅनेजर किंवा चीफ केमिस्ट,फायनान्स मॅनेजर किंवा चीफ अकाउंटंट व कृषी मॅनेजर किंवा मुख्य शेतकी अधिकारी ही पाचच पदे
खाते प्रमुख-विभाग प्रमुख या व्याख्येत घेतलेली आहेत.त्यामुळे या पाच पदांव्यतिरिक्त इतर पदे अपात्र ठरविली गेली आहेत.
बहुतांश उमेदवार हे डिस्टिलरी मॅनेजर,लीगल ऑफिसर,कार्यलयीन अधीक्षक,स्टोअर किपर,मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट, लॅब केमिस्ट, पर्चेस ऑफिसर,सेफ्टी ऑफिसर,डेप्युटी चीफ केमिस्ट, मेडिकल ऑफिसर,इडीपी मॅनेजर,कंप्यूटर ऑपरेटर,लेबर ऑफिसर, लेबर वेल्फेअर ऑफिसर,सुरक्षा अधिकारी,कार्या लयीन अधीक्षक,पर्यावरन अधिकारी आदि पदे इंदलकर समितीने सुचविलेल्या आकृतीबंधानुसार उमेदराने अर्जात नमूद केलेले पद विभागप्रमुख/ खातेप्रमुख नसल्याने स
अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत.
*अपात्र उमेदवारांची न्यायालयीन लढाईची तयारी…*
सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांचे नवीन पॅनेल बनविणेसाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षेसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यासाठी दि.३१ मे २०२२ रोजी साखर आयुक्तालयाने दिलेल्या जाहिरातीमध्ये उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता व अनुभव या विषयीच्या शर्ती-अटी नमूद करतांना उमेदवार हा कृषी शाखेचा पदव्युत्तर पदवीधर, वाणिज्य शाखेचा पदव्युत्तर पदवीधर, बी. ई. (मेकॅनिकल/ केमिकल / इलेक्ट्रीकल ), एम. एस्सी. ( वाईन ब्रिवींग अँड अल्कोहोल टेक्नॉलॉजी),चार्टर्ड अकौंटंट ,
आय. सी. डब्ल्यू. ए., कंपनी सेक्रेटरी,
एम.बी.ए. (फायनान्स), एम. बी. ए. (एचआर), किंवा साखर कारखान्यात विभागप्रमुख /खातेप्रमुख म्हणून सध्या काम करणाऱ्या- यापूर्वी काम केल्याचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांसाठी किमान मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक. सद्यस्थितीत साखर कारखान्यात किमान 5 वर्षे कार्यरत असणाऱ्या उमेदवारांनी संबंधित प्रादेशिक सहसंचालक (साखर) व संबंधित साखर कारखान्याच्या लेटरहेडवर कारखान्याच्या कार्यकारी संचालक व प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांचे प्रमाणिकरण सादर करणे आवश्यक व मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक अशी पात्रता नमुना केली होती. त्यात कोठे ही इंदलकर समितीने सुचविलेल्या आकृतीबंधानुसार उमेदराने अर्जात नमूद केलेले पद विभागप्रमुख/ खातेप्रमुख नसल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल असे म्हंटलेले नाही.त्यामुळे अर्ज अपात्र ठरत नाहीत अशी भूमिका घेऊन हे सर्व अपात्र उमेदवार उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे समजते.