Thursday, August 11, 2022

झेडपी, पंचायत समितीची आरक्षण साेडत येत्या २८ जुलैला

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

अहमदनगरसह राज्यातील २५ जिल्हा परिषदा व २८४ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

त्यात अहमदनगर जिल्हा परिषदेचे ८५ गट, तर पंचायत समितीचे १७० गणांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने नुकतेच काढले आहेत.

या आदेशात दि. २६ जुलै रोजी आरक्षणासाठी नोटीफिकेशन जाहीर होणार आहे. त्यानंतर दि. २८ जुलै राेजी झेडपी गटांसाठी जिल्हाधिकारी, तर पंचायत समिती गणांसाठी तहसीलदार आरक्षण सोडत काढणार आहेत.

आरक्षण सोडतीनंतर आरक्षणाची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध हाेईल. त्यानंतर २९ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतींवर हरकती आणि सुनावणी घेऊन गट आणि गणांचे आरक्षण अंतिम करून ते ५ ऑगस्टला राजपत्रात प्रसिद्ध करणार आहेत.

 दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर १३ जुलै रोजीची आरक्षण सोडतीची प्रक्रिया स्थगित केली होती. सुधारित कार्यक्रमानुसार अनुसूचित जाती महिला,

अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिला यांच्या आरक्षण सोडतीची सूचना स्वतः जिल्हाधिकार्‍यांनी २६ जुलै रोजी प्रसिद्ध करणार आहे.जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी जिल्हाधिकार्‍यांनी तर पंचायत समिती निर्वाचक

गणासाठी तहसीलदारांनी २८ जुलै रोजी सोडत काढायची आहे. त्यानंतर आरक्षणाची प्रारूप अधिसूचना २९ जुलै रोजी जिल्हाधिकारी प्रसिद्ध करतील.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानूसार झेडपी आणि पंचायत समितीसाठी काढण्यात येणार्‍या ओबीसींच्या जागांचे आरक्षण हे २७ टक्के राहणार आहे.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!