माय महाराष्ट्र न्यूज:मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याचे निवडणूक आयोगातर्फे निर्देश देण्यात आले आहेत. या विशेष मोहिमेला
1 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी संबंधीत माहिती दिलेली आहे. तसेच येत्या 1 ऑगस्टपासून नागरिकांनी
आपलं मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मतदार याद्या अधिकाधिक त्रूटीरहीत करण्यासाठी आता मतदार ओळखपत्राला आधार कार्ड लिंक
करण्याची मोहीम निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे.२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी ही मोहीम पूर्ण करण्याचा
निवडणूक आयोगाचा प्रयत्न असून मतदारांनी फॉर्म-६ ब भरून द्यावा, असे आवाहन निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी स्वाती थवील यांनी केले आहे. मतदार याद्या
अधिकाधिक निर्दोष करण्यासाठी ही मोहीम असली तरी ती ऐच्छीक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मध्ये
सुधारणा केल्या असून, त्याची अंमलबजावणी १ ऑगस्ट २०२२ ते १ एप्रिल २०२३ पर्यंत करण्यात येणार आहे. मतदार यादीतील तपशील प्रमाणिकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधार
क्रमांकाची माहिती संकलीत करण्यासाठी ४ सप्टेंबर २०२२ रोजी विशेष शिबीराचे आयोजन केले जाणार आहे.विशेष शिबीराच्या माध्यमातून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फतही
घरोघरी भेटी देऊन माहिती संकलीत करण्यात येणार आहे. याबाबत https://nvsp.in/ किंवा https://ceo.maharashtra.gov.in या निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.