Wednesday, August 17, 2022

भक्तांच्या श्रद्धेतूनच मंदिरांचा विकास-भास्करगिरीजी महाराज

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा/नेवासा

भक्तांच्या श्रद्धेतूनच मंदिरांचा विकास होत असतो,त्यामुळे विश्वस्तांनी मालक म्हणून नव्हे तर सेवक म्हणून काम केले पाहिजे असे प्रतिपादन श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे मठाधिपती भास्करगिरीजी महाराज यांनी केले.

नेवासा तालुक्यातील भेंडा गावचे जागृत ग्रामदैवत श्रीसंत नागेबाबांच्या चांदीच्या मूर्तीची (मुखवटा) प्राणप्रतिष्ठापणा महंत भास्करगिरीजी महाराजांचे हस्ते व माजी मंत्री शंकरराव गडाख,संत ज्ञानेश्वर मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे प्रमुख उपस्थितीत झाली.श्रीसंत नागेबाबा व संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून बुधवार दि.२७ रोजी सकाळी १० वाजता श्रीसंत नागेबाबांची पूर्वीची पंचधातूंची मूर्ती बदलून त्याठिकाणी नवीन चांदीची मूर्ती( मुखवटा) विविध पूजेने बसविण्यात आली.

यावेळी बोलताना भास्करगिरीजी महाराज पुढे म्हणाले,नागेबाबा आपल्या सर्वांच्या अंतःकरणात आहेत.बाबांचा कृपा आशीर्वाद, मीराबाई महाराजांचे मार्गदर्शन, स्वर्गीय घुले पाटलांची कृपा दृष्टी यामुळे भेंडा गावा व देवस्थान परिसराचा सर्वांगीण विकास झाला.
धार्मिक कार्यात घुले परिवाराचे सदैव सहकार्य असते.नागेबाबा मंदिर व हनुमान मंदिराच्या विकासात सर्वधर्मीयांचा वाटा आहे.
मंदिर विश्वस्तांनी मालक म्हणून नव्हे तर सेवक म्हणून काम केले पाहिजे.
कडूभाऊच्या रूपाने गावाचा सन्मान वाढला. नागेबाबा पतसंस्था ही केवळ आर्थिक संस्था न राहता सामजिक संस्था झालेली आहे.जिथे कमी तिथे आम्ही असे काम नागेबाबा परिवार करीत आहे.मंदिराचा जीर्णोद्धार होऊन भव्यबभक्त निवास उभे राहिल्याने वैभवात भर पडली.कडूभाऊंच्या हातून
सामाजिक,अध्यात्मिक, व राष्ट्रीय कार्य घडावे.

माजी मंत्री आ.शंकरराव गडाख म्हणाले,भेंडा गावातील सर्वांच्या एक वाक्यतेमुळेच देवस्थानचा विकास झाला.भेंडा ग्रामस्थांसारखा
असा एकोपा कुठे ही दिसून येत नाही.
भाविकांच्या सुख-दुःखात ही हे देवस्थान उभे राहते.

माजी आमदार पांडुरंग अभंग म्हणाले,
देवस्थानच्या कार्यात मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येतात हे भेंडा गावचे वैशिष्ट्य आहे.

यावेळी नागेबाबा परिवाराचे प्रमुख कडूभाऊ काळे,ज्ञानेश्वरचे संचालक काशिनाथ नवले,भय्यासाहेब देशमुख, रामभाऊ जगताप, मारूती महाराज झिरपे,नवनाथ धाडगे महाराज, बाळू महाराज कानडे, अंकुश महाराज कादे, डॉ.अशोकराव ढगे,अजित मुरकुटे,
तुकाराम मिसाळ, दत्तात्रय काळे,डॉ.शिवाजी शिंदे,नागेबाबा देवस्थानचे अध्यक्ष शिवाजी तागड,अशोकराव मिसाळ,देविदास गव्हाणे,गणेश गव्हाणे,बाळासाहेब गव्हाणे,नामदेव शिंदे,अशोक वायकर,अशोकराव गव्हाणे,अंबादास गोंडे,भाऊसाहेब फुलारी, अण्णासाहेब गव्हाणे, अड. रवींद्र गव्हाणे,वामन मापारी,बाळासाहेब नवले, राजेंद्र चिंधे,सरपंच सौ.उषा मिसाळ, उपसरपंच दादासाहेब गजरे, देविदास गव्हाणे, डॉ.लहानू मिसाळ,पंढरीनाथ फुलारी,रंगनाथ गव्हाणे,कादर सय्यद आदीसह भाविक-ग्रामस्थ उपस्थित होते.

वेदशास्र संपन्न गणेश गुरू यांनी पौराहित्य केले.बापूसाहेब नजन यांनी प्रास्ताविक केले.संजय मनवेलीकर यांनी सूत्रसंचालन केले.नागेबाबा परिवाराचे प्रमुख कडूभाऊ काळे यांनी आभार मानले.
मूर्ती प्राणप्रतिष्ठापणे नंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.कार्यक्रमासाठी नागेबाबा मंदिर विश्वस्त मंडळ,नागेबाबा परिवार,श्रीराम सेवा मंडळ व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

नागेबाबा पतसंस्थेच्या सभासदांसाठी दर्शनाची व्यवस्था…

नागेबाबा पतसंस्थेच्या वतीने सभासदांसाठी दर्शनासाठी वाहन व्यवस्था करण्यात आली होती.
नगर, बीड, औरंगाबाद, पुणे,नाशिक जिल्ह्यातील 58 शाखांमधून 580 सभासदांना श्रीसंत नागेबाबांच्या दर्शनाची व महाप्रसादाची संधी संस्थेने उपलब्ध करून दिली.ज्या महात्म्याचे नावाने पतसंस्था चालविली जात आहे त्याचे प्रत्यक्ष दर्शन घेऊन माहिती घेणे हा या मागचा उद्देश असल्याचे कडूभाऊ काळे यांनी सांगितले.

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!