माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात एकनाथ शिंदे यांनी नवे मुख्यमंत्री म्हणून तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन एक महिना उलटून गेला.
त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? असा सवाल रोज विरोधकांकडून विचारण्यात येत आहे. त्यावरून सणसणीत टीकाही होत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला घाबरून हे सरकार
मंत्रिमंडळ विस्तार करत नाही, त्यामुळे राज्याातील जनतेची कामं वेळेवर होत नाहीत. हे सरकार बेकायदेशी आहे. तसेच एक दुजे के लिए असाच यांचा कार्यक्रम दोघांचा चाललेला आहे अशी
ही टीका होत असतानाच आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे. येत्या 5 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
तसेच नव्या मंत्र्यांचा शपथविधी हा राजभवनात पार पडणार आहे, असे हे सांगण्यात आले आहे.आजच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं विधान केलं होतं.
मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या रविवारपर्यंत नक्की होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतची अधिकृत घोषणा करतील, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली होती.लवकरच मंत्रिमंडळाचा
विस्तार देखील होईल, परंतु त्याची तारीख जाहीर करण्याचा अधिकार मला नाही आहे, तो आमच्या मुख्यमंत्र्यांना आहे, लवकरच महाराष्ट्रात भाजप आणि सेना युतीच मंत्रिमंडळ स्थापन होईल, अशी माहिती शंभुराज देसाई यांनीही दिली होती.
आजच सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेकडून करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी पार पडली आहे. यावेळी दोन्ही बाजूने खमासान युक्तीवाद झाला. त्यानंतर
कोर्टाने दोघांच्या बाजू ऐकून घेऊन या प्रकरणाची पुढील सुनावणी ही उद्याच ठेवली आहे. त्यामुळे उद्या या प्रकरणात काही महत्त्वाचा निर्णय आल्यास त्यावर ही मंत्रिमंडळ विस्ताराची दिशा अवलंबून आहे.