नेवासा/ प्रतिनिधी
सेवानिवृत्ती वेतनात वाढ व्हावी या मागणीसाठी पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांचे नेतृत्वाखाली दि.१ ऑगस्ट पासून नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या
उपोषणाला पाठींबा देण्यासाठी जिल्ह्यातील सेवानिवृत्त कामगार दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
दिल्लीतील भविष्य निर्वाह निधी कार्यालय,भिकाजी कामा येथे दि.१ ऑगस्ट पासुन हे उपोषण चालु आहे. उपोषणचा हा सहावा दिवस आहे. देशांतील पासष्ट लाख पेन्शन धारक
आहेत.त्यांना सध्याची मिळणारी पेन्शन अत्यल्प असून हे पेन्शन धारक सहा ते सात वर्ष पासून न्यायालयीन लढाईसह अनेक प्रकारचे नवी दिल्ली येथे आंदोलन केलेले आहे. परंतु न्याय मिळत नसल्याने आंदोलन अंतिम टप्प्यात आहे. दि.८ ऑगस्ट रोजी दिल्लीत भव्य महामेळावा व मोर्चे काढण्यात येणार आहे.
या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी व मोर्चात सहभागी होण्यासाठी नगर जिल्हातील सुमारे ४५० पेन्शन धारक दि.६ ऑगस्ट रोजी शिर्डी रेल्वे स्थानकावरून रेल्वेने दिल्लीकडे रवाना झाले आहेत.यात बापुराव बहिरट, विनायक लोळगे, अशोकराव पोतदार, भानुदास कावरे, बाळासाहेब निकम,प्रभाकर बोरकर, किसन निकम, शिवाजी लांडे, सुभाष वाबळे, गवजी पडोळे,सोपान चौधरी, सय्यदनूर कंकरभाई सय्यद ,चंद्रकांत सोनवणे आदीचा समावेश आहे.