Wednesday, August 17, 2022

नगर ब्रेकींग: मोठा अपघात, पती पत्नी ठार तर मुलगा….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील विळद घाट येथे आज दुपारी कंटेनर आणि वॅगनर कार गाडीचा अपघात झाल्याने गाडीतील पती पत्नी जागीच ठार झाल्याची घटना झाली आहे.

या अपघातात चार चाकी गाडीचा चक्काचूर झाला आहे. नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

या अपघातात रवींद्र किसन पाटील वय ४५ व मनीष रवींद्र पाटील रा. पाचोळा जि. जळगाव या पती पत्नीचा मृत्यू झाला आहे. त्यांचा ९ वर्षाचा मुलगा वाचला आहे.याबाबत माहिती अशी की, नगर मनमाड महामार्गावरील दुपारी तीन वाजेच्या सुमारास जळगाव येथून पाटील कुटुंब पुणे येथे जात असताना मोठा कंटेनर येत होता.

कंटेनरचा तोल सुटल्यामुळे तो पाटील यांच्या गाडीवर जाऊन आदळल्याने अपघात घडला. या पाटील पती पत्नी जागीच ठार झाले. एम आय डीसीच्या पोलीस कॉन्स्टेबल कल्पना अवसरे व त्यांच्या पथकाने मुलाला सुखरूप बाहेर काढले. मुलाच्या डोक्याला जखम झाली

असून त्याला विखे पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत. कंटेनर चालक हा फरार झाला आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!