Thursday, August 11, 2022

संजय राऊतांच्या विधानाने राजकारणात खळबळ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :नाशिक शिवसेना कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यशैलीमुळे जिल्ह्यातील शिवसेना आमदारांना निधी मिळण्यात विलंब होण्यासह कामांचा खोळंबा होत असल्याच्या तक्रारी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी रविवारी खा. संजय राऊत यांच्याकडे केल्या.

त्यावर त्यांच्या कार्यशैलीला शिवसेना स्टाइलमध्येच उत्तर द्या, असे सांगून पुढील पालकमंत्री शिवसेनेचाच होईल, यासाठी कामाला लागण्याचे आदेश राऊत यांनी दिले.राज्यात सत्ता असूनही जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या प्रभावामुळे कामांचा खोळंबा होत असल्याच्या तक्रारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या.

या वेळी राऊत यांनी शिवसेनेकडे सत्ता नसतानाही आपण अनेकांना आपल्या स्टाइलने उत्तरे दिली आहेत. त्याप्रमाणेच पालकमंत्र्यांच्या कार्यशैलीला शिवसेना स्टाइलमध्ये उत्तर द्या, तसेच विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक आमदार निवडून आणले तर आपलाच पालकमंत्री बसवता येईल, अशी व्यवस्था करा, असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!