Wednesday, August 17, 2022

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलात नगर जिल्ह्याच्या शेजारील ‘या’ खासदार महिलेला मिळणार मंत्रीपद?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेला पराभव आणि आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा फेरबदल होणार असल्याचं बोललं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी

रात्री गृहमंत्री अमित शहा आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक केली. तसंच मोदींनी काही मंत्र्यांशी वैयक्तिक चर्चा सुरू केली असून त्यांच्या कामकाजाचा आढावाही घेतला. दरम्यान या फेरबदलात खासदार डॉ. प्रीतम मुंढे यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर तसंच नरेंद्र तोमर यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांवर दोन ते तीन मंत्रालयांची जबाबदारी आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळाच्या फेरबदलात या मंत्र्यांवरील ताण कमी करण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आठवड्याभरात हा विस्तार होण्याची शक्यता आहे.

त्यात ईसकाळनं दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र राज्यातून डॉ. प्रीतम मुंढे यांचंही नाव आघाडीवर आहे. मुंढे या सध्या बीडच्या खासदार आहेत. दिवंगत नेते गोपीनाथ मुंढे यांच्या द्वितीय कन्या आहेत. तसंच पंकजा मुंढे यांच्या लहान बहिण आहेत. प्रीतम यांनी 2014 ची लोकसभा पोटनिवडणूक लढवली.

ही निवडणूक त्या तब्बल सहा लाख 96 हजार 321 मतांच्या फरकाने जिंकल्या होत्या. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत त्यांचा लीड कमी झाला. तरीही प्रीतम मुंढे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा 1 लाख 68 हजार मतांच्या फरकानं पराभव केला होता.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!