Thursday, August 11, 2022

राज्यात या जिल्ह्यात 5 दिवस पावसाचे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मुंबईत मान्सूनचं  आगमन झाल्यानंतर पावसानं मुंबईकरांना चांगलंच झोडपून काढलं आहे. पहिल्या पावसातचं मुंबईकरांची पुरती तारांबळ उडाली होती. पण मागील दोन दिवसांपासून मुंबईला पावसानं विश्रांती दिली आहे.

त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पण आज पुन्हा मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.मागच्या आठवड्यात मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्राला व्यापलं असून अनेक ठिकाणी जोरदार मुंसडी मारली आहे.

यानंतर राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला. पण आजपासून पुढील पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आज उत्तर कोकण, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

तर उद्या (16 जून) रोजी सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उद्या मुंबई आणि पुण्यात सामान्य हवामान असेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!