Thursday, August 11, 2022

महाराष्ट्रातून देशाला मिळाली आनंदाची बातमी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनापासून बचावासाठी देशात २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस देण्यात येणार आहे. परंतु लहान मुलांच्या लसीकरणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मात्र लहान मुलांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता त्याचा प्रभाव रोखण्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.

नागपूर सेंटर लसीकरण ट्रायलमध्ये भाग घेणाऱ्या लहान मुलांवर १ आठवड्यानंतरही कोणतेही साईड इफेक्ट दिसले नाहीत. त्यामुळे मुलांना लस दिल्यानंतरचा पहिला आठवडा यशस्वी ठरला आहे. पहिल्या आठवड्यात ना कोणत्या मुलाला ताप आणि ना कोणाला लसीमुळे कोणतीही समस्या उद्भवली आहे.

६ जूनला ४० स्वयंसेवकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. क्लिनिकल ट्रायलमध्ये लहान मुलांना लसीचे डोस देण्याबाबत लवकरच निष्कर्ष काढला जाईल असं प्रमुख म्हणाले.AIIMS चे मेडिसिन विभागाचे डॉ. संजीव सिन्हा म्हणाले की, जुलैच्या अखेरपर्यंत आपल्याकडे अनेक लसी उपलब्ध होतील.

लहान मुलांवर सुरु असलेल्या ट्रायलचे निकाल पुढील ३-४ महिन्यात येतील. हे निकाल सकारात्मक राहिले तर लवकरच लहान मुलांनाही कोरोनाची लस उपलब्ध होईल. पुढील ५-६ महिने भारताच्या दृष्टीने लसीकरण महत्त्वाचे आहे. मंगळवारपासून एम्समध्ये ६-१२ वयोगटातील कोव्हॅक्सिन चाचणीसाठी नामांकन सुरू करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!