Thursday, August 11, 2022

SBI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! कोरोनाशी लढण्यासाठी बँक देतंय..

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केला. या लाटेत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. परिणामी आरोग्य व्यवस्थेवर ताण आला. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडस आणि औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. दुसऱ्या लाटेचा प्रभाव बघता अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध जारी करण्यात आले होते.

याचा थेट परिणाम लोकांच्या रोजगार, नोकऱ्यांवर झाला. अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली तर अनेकांचे उद्योग, रोजगार (Employment) अडचणीत सापडले. सद्यःस्थितीत ही लाट काहीशी ओसरताना दिसत आहे. परंतु, सरकार आणि तज्ज्ञांनी आता कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे.

रोजगार, नोकऱ्या गमवाव्या लागल्यानं सध्या अनेक जण आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत.आपत्कालीन आरोग्य स्थिती निर्माण झाली तर वैद्यकिय खर्च कसा करायचा असा प्रश्न भेडसावत आहे. यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने एसबीआय कवच पर्सनल लोन स्कीम लाँच केली आहे.

तुम्ही SBI ग्राहक असाल तर जवळच्या शाखेत जाऊन किंवा 1800 11 2211 या क्रमांकावर संपर्क करून याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकता. जाणून घेऊया या योजनेविषयी.स्टेट बॅंक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआयने 11 जूनला कोविड -19 रुग्णांसाठी कवच पर्सनल लोन ही योजना लाँच केली आहे. ही एक युनिक कोलॅटरल फ्री लोन स्कीम आहे. या योजनेअंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारांसाठी स्वस्त दरात कर्ज घेता येते.

या माध्यमातून कोरोनावरील इलाजासाठी झालेला मेडिकल खर्च रिइम्बर्समेंट केला जाऊ शकतो. यासाठी इच्छूक ऑनलाइन अर्ज करु शकतात.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!