Monday, October 25, 2021

जलसंधारण मंत्री गडाख म्हणाले टाळ्या व थाळ्यांची भंपकबाजी न करता मुख्यमंत्र्यांनी काम केलं

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील शिवसंपर्क अभियानाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, सपना मोरे, सुहास वहाडणे, डॉ. अजय गर्जे, प्रमोद लबडे, बाळासाहेब जाधव, सुनिल तिवारी, वर्षा शिंगाडे, विक्रांत झावरे, मुकुंद सिनगर, प्रफुल्ल शिंगाडे यांच्यासह पदाधिकारी, महिला व शिवसैनिक उपस्थित होते.

गडाख यांनी शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात सक्रीय सहभाग घेतला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी मेळावे घेऊन ते सरकार आणि शिवसेनेचे काम लोकांना सांगत आहेत. कोपरगाव येथील मेळाव्यात बोलताना गडाख म्हणाले, ‘करोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थाळ्या आणि टाळ्या वाजविण्याची भंपकबाजी न करता मुख्यमंत्री म्हणून आपली जबाबदारी संयमीपणे पार पाडली.

यावेळी बोलताना गडाख यांनी मुख्यमंत्र्यांचे कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘राज्यात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने चांगले काम केले आणि करीत आहोत. हे सांगण्याची एक संधी शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसैनिकांना मिळाली आहे. अनेक वर्षांच्या युतीने विश्वासघात केल्यानंतर जाहीरपणे बोलता येईना आणि कुणाला सांगता येईना.

तेव्हा नवीन प्रयोग करीत महाविकास आघाडीची स्थापना झाली. मुख्यमंत्री कोण ? यावर खल सुरू असताना पक्ष चालविणे वेगळे आणि सरकार चालविणे वेगळे असे खुलेपणाने सांगणारे केवळ उद्धव ठाकरे हेच होते. इच्छा नसतानाही ते मुख्यमंत्री झाले, ते केवळ तुमच्या आमच्यासाठीच. पैशाचा हिशोब न करता आर्थिक मेळ बसत नसतानाही शेतकऱ्यांना २४ हजार कोटींची

कर्जमाफी खुलेपणाने दिली. करोना काळात थाळ्या आणि टाळ्या वाजविण्याची भंपकबाजी केली नाही. थेट जबाबदारी स्वीकारून कामाला सुरुवात केली. तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची सर्व तयारीही केली आहे असे गडाख म्हणाले.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!