Monday, October 25, 2021

नेवासा तालुक्याचा सर्वांगिण विकासाठी ना गडाख कटीबध्द – सौ सुनीताताई शंकरराव गडाख

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा तालुक्यातील मांडेगव्हाण,मोरगव्हाण या गावांमध्ये मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख व सौ सविताताई अनिलराव अडसुरे जिल्हा परिषद चांदा गट यांच्या निधीतून मंजूर विविध विकास कामांचे भूमिपूजन पंचायत समितीच्या मा सभापती सौ सुनीताताई गडाख यांच्या हस्ते गुरुवार दि.15 जुलै 2021 विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले.

यामध्ये मांडेगव्हाण येथील शिंदे वस्ती रस्ता खडीकरण करणे , मांडेगव्हाण गावात प्राथमिक शाळा खोली बांधकाम करणे , मोरगव्हाण येथे नवीन कूपनलिका घेणे व इलेक्टरीक मोटर बसवणे , मोरगव्हाण येथे राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम करणे या सुमारे 50 लक्ष रुपये किंमतीच्या विविध लोकउपयोगी कामांचा समावेश आहे.

राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे हे तालुक्यातील पहिलेच काम असून ना.शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून हे काम मंजूर झाले आहे. या वेळी बोलताना सौ सुनीताताई गडाख म्हणाल्या की मांडेगव्हाण मोरगव्हाण ही गावे मा खा यशवंतरावजी गडाख व ना शंकरराव गडाख लाडकी गावे आहेत,या गावांनी संपूर्ण गडाख कुटुंबावर नेहमी खुप प्रेम केले आहे.

जिराईत पट्यातील या गावांना ना गडाख विविध कामांसाठी नेहमीच प्राधान्य देतात.प्रशांत गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुक्यात 38 जिम दिल्या असून त्यातील 1 जिम मांडेगव्हाण ,मोरगव्हाण या गावात मंजूर झाली आहे ती लवकरच कार्यन्वित होणार आहे.पंचायत समितीच्या माध्यमातून गावात 10 लाखांची कामे सुरू होत आहेत .

नेवासा तालुक्यात विविध रस्त्यांचे ना शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत.कामे गुणवत्तापूर्ण होण्याकडे प्राधान्याने लक्ष दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. पंचायत समितीच्या माध्यमातून गाय गोठा, शेळी गोठा ,अल्पभूधारकाचे प्रस्ताव ग्रामपंचायत व ग्रामसेवकाकडे सादर करण्याचे व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन सौ सुनीताताई गडाख यांनी केले.

तसेच मांडेमोरगव्हाण या गावाची कृषी विभागाच्या विविध योजनांची अमंलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय कोरडवाहू अभियानातून निवड करण्यात आलेली आहे त्यामाध्यमातूनही गावात विविध कृषी विषयक योजना राबविण्यात येतील व त्यातून शेतकरी बांधवाना शेती करतांना हातभार लागेल माहिती सौ गडाख यांनी दिली.

पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे यांनी पंचायत समितीच्या सुरू असलेल्या कामांची माहिती दिली यावेळी पं.स.सभापती रावसाहेब कांगुणे,उपसभापती किशोर जोजार,पं.स.सदस्य बाळासाहेब सोनवणे,अनिल अडसुरे,मा.पं.समिती सदस्य कारभारी जावळे,सरपंच अमोल जाधव,बाबुराव चौधरी, प्रकाश भालके, सरपंच धनंजय वाघ,संदीप येळवंडे,अरुण सोनकर,भानुदास सोनवणे,आप्पासाहेब शिंदे,

बबनराव बाराहाते,सरपंच लक्ष्मण घुले, बलभीम काळे, मारुती जगदाळे,एकनाथ जाधव बाबासाहेब सोनवणे,अजिनाथ जगदाळे, सर्जेराव धंदक,भीमराव सोनवणे ,देविदास उदमले,पाटीलबा जाधव,लक्ष्मण गाढे,सूर्यभान बर्डे,ज्ञानदेव धंदक, सरपंच अंबादास आव्हाड,पोपट माळी, भारत पालवे,महादेव पालवे,राजेंद्र पालवे, मच्छिंद्र घुले,गोरक्षनाथ सोनवणे,ग्रा.पं. सदस्य दिलीप सोनवणे,उपसरपंच सुरेश सुरुसे,अंकुश धंदक,

महेशराव काकडे,सौ.ताराबाई येळवंडे, सौ.चंद्रकला कार्तिक सोनवणे,सौ.शोभा विक्रम चौधरी, आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.

ताज्या बातम्या

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...
error: Content is protected !!