Monday, October 18, 2021

नगर जिल्ह्यातील त्या प्रकरणाला वेगळे वळण; तो खून नव्हे तर अपघात ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील पांडुरंग पवार यांच्या खूनप्रकरणी तिघांना बेलवंडी पोलिसांनी अटक केली. चौथा आरोपी म्हणून मृताच्या सख्या भावाचाही समावेश आहे. अगोदर हा खून गोळीबारातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला; मात्र शवविच्छेदनानंतर, तीक्ष्ण हत्याराने खून झाल्याचे सांगण्यात आले.

आता तर तो खून असण्याची शक्यता कमीच असून, अपघात असू शकतो, या तर्कावर पोलिस आल्याने, या घटनेतील गोंधळ वाढला आहे. दरम्यान, अटकेतील तिन्ही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी वाढविल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांचा तपास वेगळ्या वळणावरपवार यांचा मृतदेह ११ जुलै रोजी बेलवंडी-शिरूर रस्त्यालगत देवदैठण शिवारात आढळून आला.

मृताचा मुलगा सागर पवार याने दिलेल्या फिर्यादीवरून शंकर जयवंत पवार, दत्तात्रेय भाऊसाहेब लटांगळे, शिवदास श्रीरंग रासकर व काशिनाथ जेक्टे या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अटकही करण्यात आली. अटकेतल आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती; मात्र या चार दिवसांत आरोपींकडून खुनाबाबत माहिती मिळाली नसल्याचे समजले.

दरम्यान, पांडुरंग पवार हे ते जात असलेल्या वाहनातून खाली पडले. डोक्याला जखम झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घाबरल्याने आपण पळून गेलो, असे आरोपी सांगत आहेत. त्यांच्या जबाबामुळे पोलिसही गोंधळात आहेत. त्यामुळे हा खून की अपघात, हा संभ्रम निर्माण झाला आहे. पोलिस विविध

शक्यता तपासून पाहत आहेत. त्यामुळे पोलिसांना आता सूक्ष्म तपास करून त्यावेळी नेमके काय घडले हे उलगडून दाखवावे लागेल.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!