Friday, October 22, 2021

नगरमध्ये तरुणावर तलवार, चाकूने हल्ला

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात हॉटेलमध्ये आरडाओरडा करू नका, असे म्हटल्याचा राग आल्याने एका तरुणावर दोघांनी तलवार, चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात राहुल भाऊसाहेब आंग्रे (वय 26 रा. एकनाथनगर, केडगाव) हा तरुण जखमी झाला आहे.

11 जुलै रोजी दुपारी चार वाजता नेप्ती (ता. नगर) शिवारातील हॉटेल दर्पन येथे घडलेल्या या घटनेची फिर्याद गुरूवारी (दि. 15) नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.जखमी राहुल आंग्रे यांनी ही फिर्याद दिली आहे.त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हल्ला करणारे रोहित राजू आल्हाट, भाऊ दत्तू साळवे, गौरव राजू आल्हाट (सर्व रा. निलक्रांती चौक, नगर)

यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 11 जुलैला दुपारी चार वाजता राहुल आंग्रे व त्यांचा मित्र हॉटेल दर्पण येथे जेवण करण्याकरिता गेले होते.त्याठिकाणी रोहित आल्हाट, भाऊ साळवे, गौरव आल्हाट हे बसलेले होते. त्यांचा आरडाओरडा पाहून राहुल त्यांना म्हणाले, आरडाओरडा करू नका.

असे म्हणाल्याचा राग आल्याने रोहित आल्हाट याने त्याच्याकडील तलवारीने व भाऊ साळवे याने त्याच्याकडील चाकूने राहुलच्या डोक्यावर, हातावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपींनी राहुल यांच्यासह त्यांच्या मित्राला शिवीगाळ, मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी

दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक बोडके करीत आहेत.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!