Monday, October 25, 2021

आता पुन्हा झोडपणार पाऊस; राज्यात 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आज मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांना हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुणे, ठाणे, पालघर आणि सातारा या चार जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

या जिल्ह्यांतही काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तर पुढील तीन तासांत मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत पावसाची धुव्वाधार बॅटींग होण्याची शक्यता आहे.मुंबई वेधशाळेनं जारी केलेल्या सुधारित माहितीनुसार, आज सकाळपासूनच अरबी समुद्रातील काही भागासह मुंबई, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांत

आकाशात ढगांची मोठ्या प्रमाणात दाटी नोंदली गेली आहे. तर पुणे परिसरातही आज दुपारपासून जोरदार पावसाचे ढग जमत आहेत. याचबरोबर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी नभ भरून आलं आहे. त्यामुळे आज राज्यात उत्तर महाराष्ट्रातील काही भाग वगळता अन्य ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे.

मागील तीन दिवसांपासून मुंबईला पावसानं चागलंचं झोडपून काढलं आहे. यानंतर आता मुंबईसह पुण्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यानं पुढील पाच दिवसांसाठी मुंबईसह पुण्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील आणखी पाच दिवस मुंबईकरांची पावसापासून सुटका होणार नाही.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!