Friday, October 22, 2021

बापरे नगर जिल्ह्यातील या तालुक्यातील विवाह सोहळ्यांत 43 पॉझिटिव्ह

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांच्या आदेशानुसार रविवारी पारनेर तालुक्यात महसूल विभाग व आरोग्य विभागाच्या वतीने लग्न समारंभ, विवाह साखरपुडा कार्यक्रमाला हजर असलेल्याची सामुहिक करोना चाचणी करून घेतली.

तालुक्यात करोनाची दुसरी लाट कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. उलट दिवसंदिवस करोना बाधीतांचा आकडा वाढताना दिसत आहे. यामुळे तहसीलदार देवरे यांनी दोन दिवसापूर्वी तालुक्यातील 71 गावे संवेदनशील घोषित करून त्या ठिकाणी संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश काढले. काल मोठी लग्नतिथी असल्याने मोठ्या संख्याने एकत्र येतील आणि एकमेंकांचा संपर्क वाढून संसर्ग वाढण्याची भीती होती.

यासाठी लग्न संयोजकांना महसूल विभागाने सक्त ताकीत देत विवाह सोहळ्याला 50 पेक्षा जास्त नागरिक दिसले तर कडक कारवाईचा इशारा दिला. तसेच तालुक्यातील प्रत्येक कार्यक्रम स्थळी मंगल कार्यालय या ठिकाणी करोना चाचणी कॅम्प लावण्याचे आदेश दिले. यासाठी त्या-त्या ठिकाणचे मंडल अधिकारी, तलाठी

यांनी ग्रांमपचायत कर्मचारी व महसुल यंत्रनेला घेऊन व आरोग्य कर्मचारी यानी कार्यक्रम स्थळी प्रत्येक उपस्थितीची करोना चाचणी केली. त्यात 13 ठिकाणी 3 हजार 600 नागरिकांच्या चाचणी करण्यात आली. यात 43 बाधित आढळून आले.

सुपा येथेही औद्योगिक वसाहतीतील एका हॉलमध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम होता. तेथे तहसिलदाराच्या आदेशावरुन मंडल अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी बाळासाहेब कुसमुडे, डॉ. विद्या बारवकर, भाऊसाहेब साठे यांनी हॉलच्या दारात तपासणी कॅम्प लावून प्रत्येक उपस्थिताची तपासणी करुनच आत सोडले.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...

बापरे:कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू आढळून आला

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त डॉ. मांडे यांच्याशी सीएसआयआर मुख्यालयात सकाळने संवाद साधला. कोरोनाचा नव्या रुपातील...

नगरमध्ये दोन भावांकडून महिलेची छेडछाड लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत…

माय महाराष्ट्र न्यूज:दोन भावांनी एका विधवा महिलेची छेडछाड करीत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून विकास शामसुंदर गायकवाड...

फडणवीसांची जिरवायची हे गडकरींसोबत आधीच ठरलं होत: काँग्रेस नेत्यांचा खळबळजनक दावा

माय महाराष्ट्र न्यूज:नांदेड इथल्या बिलोली येथे आयोजित प्रचारसभेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला बहुमत जरी...
error: Content is protected !!